Random Posts

डॉ. अमोल बागुल यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर...@@@ Dr. Amol Bagul got national



@@@@डॉ. अमोल बागुल यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर...@@@ Dr. Amol Bagul got national 
अहमदनगर सावेडीतील श्रीसमर्थ विद्यामंदिर  माध्यमिक विभागात विज्ञानाचे शिक्षक असलेल्या  डॉ. अमोल बागुल यांना २०१८  चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 
- भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018 अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक विभागाचे शिक्षक "डॉ. अमोल सुभाष बागुल" यांना जाहीर झाला आहे. 

- अमोल बागुल महाराष्ट्रात एकमेव आणि  देशात  पहिले व्यक्ती ठरले आहेत.देशातील ५३ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्या मध्ये  "डॉ. अमोल सुभाष बागुल" महाराष्ट्रात एकमेव आणि  देशात  पहिले व्यक्ती ठरले आहेत.

-(५ सप्टेंबर) शिक्षकदिनी  दिल्लीमधील "विज्ञान भवनात" " राष्ट्रपती रामनाथ कोविंद" यांच्या हस्ते ह्या  पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

रजत पदक, मानपत्र आणि ५०,०००  रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे  त्यातील 35000 रुपये महापूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये व सुमारे 15000 रुपये नगर प्रेस क्लबच्या विविधांगी विधायक उपक्रमांसाठी डॉ.बागुल प्रदान करणार आहेत.

@@@@ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २४ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश @@

 -- इंग्लंडमध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २०-२० क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. 

-- राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली.

--- ICC नी  याबाबत tweet करुन याची माहिती दिली. त्यामुळे 24 वर्षांनी राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होणार आहे.

-- क्रिकेटच सर्व समाने बर्मिंहॅम Barmiham येथील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. 

---यामध्ये एकूण ८  महिला संघ सहभागी होणार आहेत. 

--- याआधी 1998 च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकलं होतं.

---- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष लुईस मार्टिन Luies  Martin यांनी याबाबत आनंद व्यक्त केला.

---- आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे 

----   स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगला मंच असल्याच लुईस मार्टिन यांनी म्हटलं.


---राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते सात ऑगस्ट 2022 पर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडणार आहे. 
---राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमधील जवळपास 45 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.






Post a Comment

0 Comments